breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

बहुमतामुळे भाजपचे लोक शेफारलीत ; अन्ं निघालीत संविधान बदलायला – अजित पवारांची टीका

लबाडाचं आवतंन जेवल्याशिवाय काय खरं – अजित पवारांची भाजपवर टिका

पिंपरी – निवडणूकीत जरा जास्तच बहुमत मिळाल्यामुळे भाजपची लोक चांगलीच शेफारली आहेत. त्यामुळे हे लोक आता संविधान बदलाची भाषा करु लागली आहेत. त्या लोकांना संविधान बदलायचा अधिकार कुणी दिला ? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तसेच त्यांचे मुख्यमंत्री पालघरच्या पोटनिवडणूकीत साम, दाम, दंड, भेदची भाषा करुन आरे ला कारे करण्याचे आदेश देवू लागल्याने ह्या लोकांना सत्तेचा माज किती चढलाय हे लोकांना कळून चुकलंय, अशा शब्दांत भाजपचा वाढत्या गुंडगिरी, दहशतीचा अजित पवारांनी समाचार घेतला.

आकुर्डीतील केरला भवनात वार्तालाप कार्यक्रमात ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, योगेश बहल, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, भाऊसाहेब भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. भाजप नगरसेविका व त्याच्या पतीच्या त्रासाला कंटाळून टपरीधारक आत्महत्या करु लागले आहेत. संबंधिताची चाैकशी होवून तत्काळ अटक करायला हवी, तसेच शहरात पोलीस आयुक्तालय लवकरच सुरु होईल, तरीही गु्न्हेगारी कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. याकरिता राजकीय दबावाला बळी न पडणारा, कडक, शिस्तीचा कायद्यांच्या अधिन राहून काम करणारा आयुक्त द्यायला हवा. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  ते म्हणाले शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवत आहे. बंद पाईपलाईनचा प्रश्न रेंगाळला आहे. नवनगर विकास प्राधिकरण हे पीएमआरडीएत विलीनीकरणास निघालेत, त्यापेक्षा ते महाापालिकेत विलीकरण करायला हवे, आरक्षण नाही, नोक-या नाहीत, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ वाढलेत, महागाईला गगनाला भिडली, शेतक-याला मालाला हमी भाव नाही, निगडी ते कात्रज मेट्रो कधी होणार, यासह असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत.

अनधिकृत बांधकामास लावलेला शास्ती कराचा विषय संपुर्ण राज्याचा प्रश्न होता. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कुंटे समिती नेमून त्याचा अहवाल आल्यानंतर कार्यवाही करण्यात येणार होती. परंतू, तोपर्यंत निवडणूका होवून सत्ता बदल झाला. तरीही मुख्यमंत्र्याना भेटून शास्तीकरावर योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी आम्ही केली,  त्यावर भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाने पुर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर माफ करण्यास मान्यता दिली खरी, मात्र त्याचा अध्यादेश निघाल्यानंतर शास्तीकर माफीचा शहरातील किती नागरिकांना लाभ होईल, हे लबाडाचं आवतंन जेवल्याशिवाय काय खरं? अशी टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

दरम्यान, यापुर्वी बैलगाडा शर्यत, बोपखेलच्या रस्त्याचा प्रश्न, रेडझोन प्रश्न, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडविला म्हणून स्वतःची लाल करुन अनेकजण तोडांवर पडल्याचे त्यांनी आवर्जुन यावेळी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button