breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
बहिणीला मारहाण केल्याचा जाब विचारल्याने भावाला बेदम मारहाण

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – बहिणीला मारत असल्याचा जाब विचारल्याने तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास चिंचवडगावातील भीमनगर येथे घडली.
सागर भागवत सपकाळे (वय २६, रा. भिमनगर चेतना बियरबार समोर, चिंचवडगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नितीन भगवान जगताप (वय ५०, रा. भिमनगर) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहत्या घरासमोर बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास नितीन हा सागरच्या बहिणीला मारत होता. सागरने तुम्ही माझ्या बहिणीला का मारता, असा जाब विचारला. यामुळे रागावलेल्या नितीनने लाकडी बॅटने सागरला जबर मारहाण केली. सागर चांगलाच जखमी झाला आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.