Mahaenews

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याचे गुप्तांग कापले!

Share On

तिरुअनंतपूरम, केरळ : एका महिलेने मोठ्या धाडसाने आपल्यावरील बलात्काराचा प्रयत्न हाणून पाडला. एवढचं नव्हे तर तिने या घटनेत बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याचे गुप्तांगच कापले.
केरळच्या तिरुअनंतपूरम जिल्ह्यातील पेट्टाह इथे काल रात्री ही घटना घडली. या घटनेत बलात्काराच्या प्रयत्नात जखमी झालेल्या आरोपीला नंतर उपचारासाठी रुग्णायात दाखल करण्यात आलं. ‘महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. त्यांच्या कुटुंबियांचं एकमेकांच्या घरी येणं जातं होतं’, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या दोन वर्षापासून आरोपी आपल्याला छळत होता अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर महिलेविरोधात कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही.

 

Exit mobile version