breaking-newsराष्ट्रिय

बनावट कागदपत्रांच्या आधारे ६८ जणांना एचडीएफसी बँकेत नोकरी

बनावट कागदपत्रांच्या आधारे एचडीएफसी बँकेत नोकरी देणाऱ्या एका कन्सल्टन्सीविरोधात गुरुग्राममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत बनावट कागदपत्रांच्या आधारे ६८ जणांनी बँकेत नोकरी मिळवल्याचे समोर आले आहे.

एचडीएफसी बँकेतील कर्मचारी गीतांजली बग्गाची अंतर्गत चौकशी सुरु होती. या चौकशी दरम्यान नोकर भरतीतील घोटाळा उघड झाला.गीतांजली बग्गा ही तरुणी ऑक्टोबर २०१७ मध्ये बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून रुजू झाली. फेब्रुवारी २०१८ मध्ये तिच्या कागदपत्रांची पडताळणी करताना कागदपत्र बनावट असल्याचे समोर आले. गीतांजली अडेको कन्सल्टन्सीमार्फत ती एचडीएफसीत रूजू झाली होती. चौकशीदरम्यान गीतांजलीने कन्सल्टन्सीचा व्यवस्थापक अमित चौधरी याला ६० हजार रुपये दिल्याचे मान्य केले. त्याने बनावट सॅलरी स्लिप, अनुभवाचा दाखला आणि अन्य कागदपत्रे तयार करुन दिल्याचे तिने सांगितले.

गीतांजलीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाल्यानंतर एचडीएफसीने या कन्सल्टन्सीमार्फत भरती झालेल्या सर्वांच्याच कागदपत्रांची पडताळणी केली. यात एकूण ६८ जणांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे समोर आले. अमित आणि त्याचा मित्र सत्येंद्र पाल या दोघांनी ही कागदपत्रे तयार केली होती.

एचडीएफसीच्या एचआर विभागाच्या उपाध्यक्ष भारती सोनी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा एक प्रकारचा घोटाळाच आहे. एचडीएफसीचा संबंधित कंपनीशी कोणताही करार नाही. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी कटीबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले. एचडीएफसी बँकेने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली असून यातील सत्येंद्र हा एचडीएफसीच्या नोएडा येथील शाखेचा व्यवस्थापक होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याने अडेकोला एचडीएफसीतील नोकरीसाठी १ लाख ४५ हजार रुपये दिल्याचे उघड झाले आहे. नोकरी मिळाल्यानंतर त्याने अन्य लोकांना यासंदर्भात प्रशिक्षण दिल्याचे समोर आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button