breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बँकेत ठेवी ठेवताना ठेवीचा नव्हे तर कर्जाचा व्याजदर विचारा…..विद्याधर अनास्कर

पिंपरी-  कोणत्याही बँकेत ठेव ठेवताना, ठेवीचा व्याजदर न विचारता बँकेच्या कर्जाचा व्याजदर विचारावा. कर्जाचा व्याजदर जास्त असेल तर ठेव ठेवू नये. कारण, कर्जाचा व्याजदर मार्केटच्या तुलनेत कमी असेल तर कर्ज थकीतचे प्रमाण कमी असते. अधिक दराने कर्ज घेणा-यास त्याची परतफेड परवडत नाही. बँक अडचणीत सापडते. लाभ हा रिजनेबल असणे ठिक पण अधिक लोभ करायला गेल्यास नुकसान होऊ शकते. हे ठेवीदारांनी लक्षात घ्यावे. असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ विद्याधर अनास्कर यांनी केले.
चिंचवड गावातील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत ‘बॅंकिंग-सामान्यांच्या दृष्टीकोनातून’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना अनास्कर बोलत होते. अध्यक्षस्थानी अभय पोकर्णा होते. यावेळी नगरसेवक अमित गावडे, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सचिव गजानन चिंचवडे, समनव्यक सुहास पोफळे आदी उपस्थित होते.
यावेळी अनास्कर म्हणाले की, पूर्वीच्या काळी बँकांचा प्रसार झाला नव्हता तेव्हा लोक गाडग्या – मडक्यात पैसे ठेवत आजही गृहिणी पैसे साठवतात. अन अडिअडचणीला घरातील कर्त्या पुरुषाला ते उपलब्ध करुन देतात मात्र, अर्थव्यवस्थेत या कृतिला शुन्य मार्क्स दिले जातात. आजही पन्नास टक्के लोकांना बॅंकींगची सवय नाही. पैसा घरातच साठवून ठेवणे अयोग्य आहे. हा अनुत्पादक पैसा उत्पादकतेकडे वळला तर हळूहळू समाज व राष्ट्र प्रगतिपथावर जाईल. जनधन योजनेसारख्या माध्यमातून सरकारला हेच सांगायचे आहे. बॅंकेत पैसे ठेवणे म्हणजे बँकींग नव्हे तर आपले छोटे आर्थिक व्यवहारही बॅंकींगच्या माध्यमातून चेकव्दारे होणे अपेक्षित असल्याचे सांगितेल. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बहिरजी चिंचवडे यांनी केले,  महेश गावडे यांनी आभार मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button