breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, दोघांवर गुन्हा

भिडे-एकबोटेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविषयी पोस्ट

पिंपरी : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करणाऱ्या पिंपरीतील अनिता सावळे या महिलेविरुद्ध पिंपरीतील दोघांनी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या प्रकरणी अनिता रवींद्र सावळे यांनी वाकड पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र शिंदे, दिगंबर पडवळ या आरोपीसह इतरांविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, ही घटना रविवारी घडली, मात्र गुन्हा मंगळवारी उशिरा दाखल झाला आहे. फेसबुकवर माहिलेविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गुन्हा दाखल केला आहे. फेसबुकवर अशी पोस्ट करणारे कार्यकर्ते कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत का? याबाबत वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button