फेरीवाल्यासाठी आता राज्यव्यापी लढा
- मुंबई हॉकर्स संघटनेची बैठक
- महाराष्ट्र राज्य फेरीवाला संघर्ष समिती गठीत
- फेरीवाल्यांच्या हितासाठी समितीने घेतला निर्णय
पिंपरी – मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणेसह महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरांमध्ये टपरी पथारी हातगाडी धारकांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई सुरू आहे. सरकार उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे उल्लंघन करत आहे. फेरीवाले यांच्या विरोधात नियम बनवत आहे. या विरोधात लवकरच राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती कष्टक-यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिली आहे.
मुंबई हॉकर्स संघटनेच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र लेबर संघटनेच्या कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. यावेळी शशांक राव , बाबा कांबळे, शकर साळवी, शांताराम चव्हाण, शब्बीर विद्रोही, रवी राव, शिवाजी गोरे, प्रल्हाद कांबळे , बळीराम काकडे , धर्मराज जगताप , राजू पोटे, दिलीप सुराडकर आदी उपस्थित होते.
राज्यव्यापी लढा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य फेरीवाला संघर्ष समिती गठीत करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी शशांक राव , सरचिटणीस पदी बाबा कांबळे , कार्यध्यक्ष पदी शांताराम चव्हाण , शब्बीर विद्रोही , रवी राव यांची निवड करण्यात आली. 9 व १० मे रोजी मुंबई येथे राज्यव्यापी मेळावा घेऊन त्यानंतर महाराष्ट्रतील सर्व जिल्ह्यात मेळावे घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला, अशी माहिती बाबा कांबळे यांनी सांगितली.