फेमिनिझमबाबत वक्तव्य करून करीना अडकली

सध्या करीना कपूर खान “वीरे द वेडिंग’ या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान “फेमिनिझम’ बाबत तिने दिलेल्या एका वक्तव्यामुळे तिला ट्रोल केले जायला लागले आहे. “स्त्रिया आणि पुरुषांमधील समानतेवर आपला विश्वास आहे.
मात्र मी फेमिनिस्ट नाही.’ असे ती म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यावरून काही जण निराश झाले तर काही जणांनी तिच्यावर टीका करायला सुरुवात केली. तर बहुतेकजण करीनाच्या या वक्तव्यावरून कन्फ्युज झाल्याचेच बघायला मिळाले. करीनाच्या वक्तव्यामुळे निराश झालेल्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे की अनेक जणी करीनासारखाच विचार करतात. ही तर खरी दुःखाची बाब आहे.
काही जणांनी करीनाची चेष्ठा करायला सुरुवात केली. एकाने म्हटले आहे की “मी हल्क नाही, पण मला हिरव्या रंगातील वस्तू नष्ट करायला आवडतात.’ तर दुसऱ्याने म्हटले आहे की “मी ऍनिमल लव्हर नाही, पण मला प्राण्यांबद्दल विशेष प्रेम वाटते आहे. ‘ अरीनाचे “फेमिनिझम’ बाबतचे वक्तव्य म्हणजे अशाच प्रकार दोन्ही बाजूंनी व्यक्त होणारे मत आहे. तिला नक्की काय म्हणायचे होते, हे कोणालाच समजले नाही.