breaking-news
फॅशनिस्टा सोनम कपूरचा आज वाढदिवस…

‘फॅशनिस्टा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूरचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. तिने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘सावरियॉं’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
सोनमचा जन्म 9 जून 1985 रोजी मुंबईतल्या चेंबूर येथे झाला. जुहूमधील आर्यविद्यामंदिर शाळेत तिने शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच तिला बास्केटबॉल आणि नृत्याची खूप आवड आहे. युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट लंडनमधून तिने पदवीचे शिक्षण घेतले.
सोनमने आपल्या सहज-सुंदर अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तिने नुकतंच प्रियकर आनंद आहुजासोबत लग्न केले. लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच वाढदिवस आहे.