breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

फिलीपाईन्सच्या अध्यक्षांची चीनला युद्धाची धमकी

मनीला : फिलीपाईन्सचे अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते यांनी दक्षिण चीन समुद्रावरून चीनला धमकी दिली आहे. चीनने या क्षेत्रातील नैसर्गिक संपदेच्या वापराची मर्यादा ओलांडल्यास आपला देश युद्धासाठी तयार असल्याचे दुतेर्ते यांनी म्हटले आहे.

चीनने अलिकडेच वादग्रस्त दक्षिण समुद्राच्या कृत्रिम बेटावर पहिल्यांदाच स्वतःची बॉम्बवर्षक विमाने उतरविली आहेत. या कृतीमुळे क्षेत्रातील तणाव वाढला आहे. चीनच्या या कृतीबद्दल आम्ही तीव्र आक्षेप नोंदविणार आहोत, चीनला आमच्या नाराजीची जाणीव करून दिल्याचा दावा फिलीपाईन्सच्या विदेश मंत्र्यांनी केला.

दक्षिण चीन समुद्राच्या सर्वच क्षेत्रावर चीन स्वतःचा दावा सांगतो, तर फिलीपाईन्स, व्हिएतनाम आणि तैवानसोबत अनेक देश चीनच्या या दाव्याला प्रखरपणे विरोध करत आहेत.आंतरराष्ट्रीय न्यायालयाने देखील चीनचा दावा फेटाळून लावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button