breaking-newsताज्या घडामोडीपुणे

प्लॉस्टिक बंदीवर महापालिकेची विशेष जनजागृती अभियान

पिंपरी – पर्यावरणाची आणि नागरिकांच्या आरोग्याची हानी टाळण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, कप, प्लेट्स, बाटल्या इत्यादींच्या उत्पादनांवर तसेच वापरावर पूर्णपणे बंदी आणून, महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील त्याची अंमलबजावणी सुरु केली असून प्लॉस्टिक न वापरण्यासाठी पालिका मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार असल्याची, माहिती आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांनी दिली.

राज्यात प्लास्टिक बंदीच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भात पर्यावरण विभागाने पावले उचलली आहेत. त्यानुसार प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरी बॅग) उत्पादन, विक्री व वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये प्लॉस्टिक पिशवी, थर्माकॉल, बिसलरी बॉटल, पत्रावळ्या, ग्लास यावर बंदी घालण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील याची अंमलबजावणी सुरु केली आहे. प्लॉस्टिक वापरण्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून 5 ते 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.

पालिका व्यापारी, किरकोळ विक्रेते, वापरकर्ते यांच्याकडून प्लॉस्टिक जमा करुन घेणार आहे. जमा झालेल्या वस्तू मोशीतील प्लॉस्टिक फुअरलमध्ये नेऊन इंधन निर्मिती केली जाणार आहे. पिंपरी महापालिकेचा आरोग्य विभाग प्लॉस्टिक बंदीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहे. प्लॉस्टिक उत्पादकाची 17 एप्रिलला बैठक बोलविण्यात आली असून 19,20, 21 एप्रिल रोजी विशेष मोहीम आयोजित केली आहे. अंमलबजावणीबाबत पालिकेच्या आठही क्षेत्रिय कार्यालयाला पत्रे पाठविली आहेत. सीएसआरअंतर्गत प्लॉस्टिक न वापरण्याच्या जनजागृतीची पत्रके उपलब्ध होणार असून शहरात त्या पत्रकांचे वाटप केले जाणार आहे, असेही लोणकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button