मनोरंजन

प्लॅस्टिक विरोधासाठी कंगणाचा हटके प्रयत्न

दोनच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा झाला. जगभर पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत चिंता व्यक्‍त केली जात असताना भारतात “बीट प्लॅस्टिक पोल्युशन’ या थीम खाली प्लॅस्टिकच्या वाढत्या वापराला कमी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचे किती नुकसान होते आहे, याबाबत जनजागृती करण्यासाठी बॉलिवूड तारकाही सरसावल्या आहेत. त्यातच प्लॅस्टिकच्या विरोधासाठी कंगणा रणावतने अभिनव शक्कल लढवली होती.

तिने एक व्हिडीओ रिलीज केला आहे. त्यातून तिने प्लॅस्टिकचा वापर थांबवण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडीओमध्ये कंगणाने आपल्या चेहऱ्यावरच प्लॅस्टिक बॅग घातली आहे. या बॅगेवरच “स्टॉप प्लॅस्टिक सफोकेशन’ असे लिहीले आहे. केवळ 10 सेकंद आपण प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये तोंड घालून आपला श्‍वास रोखू शकतो का, हे तपासून पहा. श्‍वास घ्यायला किती अडचण येऊ शकते, याचा अंदाज येऊ शकेल. जर आपण प्लॅस्टिकचा असाच सर्रास वापर करत राहिलो तर एक दिवस आपल्याला समुद्रामध्ये माशांपेक्षाही जास्त प्लॅस्टिक बॅग आढळून येतील, असे कंगणाने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. आपल्या संदेशाच्या शेवटी कंगणाने सर्वांना प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.

याशिवाय आणखी एका गोष्टीसाठी कंगणा सध्या चर्चेत आली आहे. तिने भारतीय स्त्रियांच्या पारंपारिष वेशभुषेबाबत असे काही विधान केले आहे, की त्याचे समर्थन करण्याऐवजी महिलांनीच तिच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. भारतीय स्त्रियांना साडी कशी नेसायची हे समजायला पाहिजे, असे कंगणा म्हणाली आहे. याचा अर्थ भारतीय स्त्रियांना साडी नेसता येतच नाही, असा होतो. पण साडीचा आग्रहच कशासाठी असा मुद्दा उपस्थित करून काही महिलांनी कंगणाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. कंगणा नेहमीच साडी परिधान करते हे सगळ्यांनाच माहिती आहे. साडीतील सुंदरतेला कोणीही नावे ठेवू नये, असे म्हणून तिने चक्क भारतीय संस्कृतीची रक्षक असल्याचा आविर्भावही आणला होता. तिने आपल्या पेहरावातून ते दर्शवलेही आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button