breaking-newsआंतरराष्टीय

प्रिन्स हॅरी-मेगन मार्कल यांच्याकडून 63 कोटींचा आहेर परत

लंडन – प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचे रॉयल वेडिंग जगभरात गाजले. लग्नात मिळालेला तब्बल 63 कोटी रुपये किमतीचा आहेर हे रॉयल नवदाम्पत्य परत करणार आहे.

कृपया भेटवस्तू आणू नयेत, असा स्पष्ट उल्लेख निमंत्रण पत्रिकेत करूनही केनिंगटन पॅलेस गिफ्ट बॉक्‍सनी भरुन गेले होते. सेलिब्रेटीज आणि काही कंपन्यांनी नवदाम्पत्याला गिफ्ट्‌स पाठवली होती. ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्‍स ही गिफ्ट्‌स परत करणार आहेत. सात मिलियन पाऊण्ड म्हणजे 62 कोटी 97 लाख 52 हजार 190 रुपये किमतीच्या या भेटवस्तू आहेत.

रॉयल कपलला आलेल्या बहुसंख्य भेटवस्तू प्रमोशनल असल्याची माहिती आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे एका कंपनीने रॉयल जोडप्याला हनिमूनला घालण्यासाठी बिकीनी आणि स्विमिंग ट्रंक कॉम्बोही पाठवला आहे.

भेटवस्तू स्वीकारण्याबाबत रॉयल कुटुंबाची कठोर नियमावली आहे. केनिंग्टन पॅलेसच्या अधिकृत नियमांनुसार गिफ्ट घेताना संबंधित रॉयल सदस्याची परवानगी घेणे अनिवार्य आहे. रॉयल सदस्यांना वैयक्तिकरित्या न ओळखणाऱ्या यूकेमधील ज्या नागरिकांनी भेटवस्तू पाठवल्या आहेत, त्यांचा हेतू माहित नसल्यामुळे त्या परत केल्या जातात. दीडशे पाऊण्ड (13 हजार 493 रुपये) पेक्षा कमी किमतीच्या भेटवस्तूच रॉयल कुटुंबाने स्वीकाराव्यात आणि वापराव्यात असाही नियम असल्याचे म्हटले जाते.

लग्नात भेटवस्तू पाठवण्याऐवजी धर्मादाय संस्थांना ही रक्कम दान करण्याचं आवाहन, ड्यूक अँड डचेस ऑफ ससेक्‍स यांनी विवाहापूर्वी केलं होतं. जोडप्याने व्यक्तिशः निवडलेल्या या सात चॅरिटी ट्रस्ट्‌समध्ये मुंबईतील ‘मैना महिला फाऊण्डेशन’चाही समावेश होता.

ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांचे रॉयल वेडिंग लंडनमधील सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये 19 मे रोजी झाले होते. प्रिन्स हॅरी हे दिवंगत प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचे धाकटे पुत्र, तर क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button