breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

प्राप्तीकराच्या छाप्यामध्ये 215 कोटींचा काळापैसा उघड

नवी दिल्ली – प्राप्तीकर विभागाने गेल्या आठवड्यात दोन रिअल इस्टेट समुहांवर घातलेल्या छाप्यांमध्ये सुमारे 215 कोटींचा काळापैसा उघड करण्यात आला आहे. या दोन्ही समुहांच्यावतीने राजधानी दिल्लीत यमुना किनाऱ्यांवरच्या जमिनी आणि फार्महाऊसची विक्री उच्चभ्रू गुंतवणूकदारांना केली जात होती.

प्राप्तीकर विभागाच्या दिल्लीतील शाखेच्यावतीने या दोन्ही विकसकांशी संबंधित एकूण 33 ठिकानांवर छापे घातले गेले होते. मात्र ही ठिकाणे आपल्याशी संबंधित नसल्याचे या विकसकांनी म्हटले आहे. हे दोन्ही विकसक आणि त्यांचे ग्राहक करचुकवण्यासाठी खरेदी विक्रीचे व्यवहार रोख करत असत. या डेव्हपरबरोबर व्यवहार करणारे ग्राहकही आता प्राप्तीकर विभागाच्या तपासाखाली आले आहेत.

हे विकसक विक्री केलेल्या मालमत्तेच्या मूळ किंमतीच्या आधारे प्राप्तीकर परतावे दाखल करत असत. मात्र प्रत्यक्षातील व्यवहार यापेक्षा खूपच जास्त रकमेचा होत असे. बहुतेकवेळा विक्री करणारे ही जास्तीची रक्कम रोखीच्या स्वरुपात स्वीकारत असत. त्यांच्यासाठी ही बेहिशोबी मालमत्ता असे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. करचुकवेगिरीसाठीची ही पद्धत या विकसकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून वापरली जात होती. प्राप्तीकराच्या छाप्यांमध्ये एकूण 215 कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघड झाले.

मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारात 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रोखीच्या व्यवहारावर बंदी आहे. तसेच 2 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जवळ बाळगण्यासही बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा जमिनी खरेदीमध्ये काळ्या पैशाची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची यादी करून त्यांचीही आता छाननी प्राप्तीकर विभागाकडून केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button