breaking-newsराष्ट्रिय

प्रभू रामचंद्र स्वप्नात आले, शहजादचा झाला संजू राणा

उत्तर प्रदेशात शामली येथे रहाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह धर्मांतर करुन हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. प्रभू रामचंद्र माझ्या स्वप्नात आले. त्यांनी मला हिंदू धर्म स्वीकारायला सांगितला असा दावा या व्यक्तीने केला आहे. धर्मपरिवर्तनानंतर पूर्वीचा शहजाद आता संजू राणा झाला आहे. माझे पूर्वज हिंदू होते पण धर्मांतर करण्यास त्यांना भाग पाडल्यामुळे ते मुस्लिम बनले असा दावा संजू राणाने केला आहे.

प्रभू रामचंद्र मागच्या १५-२० दिवसापासून माझ्या स्वप्नात येत होते. ते मला पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्यास सांगत होते. आम्ही आधी हिंदूच होतो. काही शतकांपूर्वी परकीय आक्रमक इथे आले. त्यांनी माझ्या पूर्वजांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडला. मी आता माझ्या मूळाकडे परतत आहे असे संजू राणाने सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

धर्मांतरासाठी कुठल्याही व्यक्ती किंवा संघटनेचा माझ्यावर दबाव नव्हता. स्वेच्छेने मी हा निर्णय घेतला. माझे कुटुंबिय सुद्धा या निर्णयाने आनंदात आहेत असे संजू राणाने सांगितले. भगवान राम माझ्या स्वप्नात आले होते हे माझ्या समाजाला कळल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल याची मला चिंता लागून राहिली होती असे संजूने सांगितले.

मला जे भय वाटत होते त्यापेक्षा परिस्थिती वाईट होती. काही लोकांकडून मला धमक्या मिळाल्या होत्या. माझे काका सुद्धा माझ्या धर्मपरिवर्तनाच्या निर्णयाविरोधात होते असे संजू राणाने सांगितले. राणाने पोलिसांशी संपर्क साधून संरक्षणाची मागणी केली आहे. पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन मी माझा जीव वाचवला. मला आता माझ्या मुलांची चिंता लागून राहिली आहे असे संजू राणाने सांगितले. संजूच्या जीवाला धोका असल्याबद्दल आम्हाला अद्यापपर्यंत कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही असे पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button