Views:
220
नवी दिल्ली: ‘माझ्या जवानांना मारलेल्या प्रत्येक थपडेच्या बदल्यात १०० जिहादींना ठार मारायला हवं’, अशी संतप्त प्रतिक्रिया क्रिकेटपटू आणि आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने व्यक्त केली आहे. गंभीरसोबतच वीरेंद्र सेहवागनेही ‘बदतमीजी की हद होती है’, अशा शब्दांत जवानांवर हात उचलणाऱ्यांना सुनावले आहे.
काही काश्मिरी युवकांनी निमलष्करी दलाच्या जवानांना थप्पड मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारावर गौतम गंभीरने आज ट्विटरच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला. ‘जे कुणी स्वातंत्र्य मागत आहेत त्यांनी येथून चालते व्हावे. काश्मीर आमचं आहे’, असं गंभीरनं सुनावलं आहे. #kashmirbelongs2us हा हॅशटॅगही त्याने वापरला आहे.