प्रतिहल्ल्याने पाकिस्तान जेरीला, पाक रेंजर्सने गोळीबार थांबवण्याची केली विनंती

श्रीनगर – सीमेवर शस्त्रसंधींचे उल्लंघन करणे ही पाकिस्तानची नित्याची सवय. कालही पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचा भंग करत सीमेवर गोळीबार केला. मात्र आपल्या जवानांनांनी-बीएसएफच्या जवांनांनी उत्तरादाखल केलेया जोरदार प्रतिहल्ल्यात पकिस्तानचे मोठे नुकसान झाले असून 1 पाकिस्तानी सैनिक मारला गेला आहे.
बीएसएफच्या या जोरदार प्रतिहल्ल्याने गांगरलेल्या पाकिस्तानने बीएसएफला गोळीबार थांबवण्याची विनंती केली आहे. या संदर्भात बीएसएफने 19 सेकंदांचा एक थर्मल इमेजरी व्हिडियो जारी केला आहे. यात पाकिस्तानकडून शस्त्र्रसंधींचा भंग करत झालेला गोळीबार केला आणि तोफगगोळ्यांचा मारा दाखवण्यात आला आहे, त्याचप्रमाणे बीएसएफने केलेल्या जोरदार प्रतिहल्ल्याची माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या काश्मीर भेटीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराता अधिक वाढ झाली आहे. या वर्षी शस्त्रसंधीभंगाच्या झालेल्या 700 पेक्षा अधिक घटनांमध्ये 18 जवानांसह 38जण मारले गेले असून अनेक जण जखमी झाले आहेत.