Views:
147
सिंगापूर: किदाम्बी श्रीकांतला नमवत सिंगापूर ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत बी. साई प्रणीतने आज विजेतेपद पटकावलं. स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना श्रीकांत आणि प्रणीतमध्ये रंगला. प्रणीतने श्रीकांतचा १७-२१, २१-१७, २१-१२ अशा तीन सेटमध्ये पराभव केला. ५४ मिनिटं त्यांचा हा सामना चालला.
सामन्यात सुरुवातीपासूनच प्रणीतने श्रीकांतवर पकड कायम ठेवली. यामुळे प्रणीतला विजेतेपद पटकवता आले. बॅडमिंटनच्या इतिहासात प्रथमच दोन भारतीय खेळाडूंमध्ये सुपर सीरिज स्पर्धेची अंतिम लढत झाली. यापूर्वी केवळ चीन, इंडोनेशिया आणि डेन्मार्कच्या दोन बॅडमिंटनपटूंमध्येच सुपर सीरिज स्पर्धेची अंतिम लढत रंगली होती. या स्पर्धेत उपांत्य फेरीत श्रीकांतने इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिंटिंगला, तर साई प्रणीतने कोरियाच्या ली डाँग केयूनवर मात केली.
Like this:
Like Loading...