breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘प्रगती एक्स्प्रेस’चे रुपडे पालटले!

पुणे- मुंबईदरम्यान दररोज धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसचे रूपडे अंतर्बा बदलण्यात आले आहे. नव्या सुविधा आणि आकर्षक स्वरूपातील ही गाडी ४ नोव्हेंबरपासून धावणार आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ‘प्रोजेक्ट उत्कृष्ट’च्या अंतर्गत प्रगती एक्स्प्रेसच्या अंतर्गत रचनेत आणि सजावटीमध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल केले आहेत. जुन्या डब्यांना नवा आकर्षक साज चढविण्यात आला आहे. गाडीचा रंग पूर्णत: बदलण्यात आला आहे. डब्यांच्या अंतर्गत भागामध्ये आकर्षक नक्षी साकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि पर्यटनस्थळांच्या छायाचित्रांचाही समावेश करण्यात आला आहे.

दोन्ही आसनांमध्ये प्रवाशांसाठी ‘रेड कार्पेट’ टाकण्यात आले आहे. गाडीत प्रवेश करताच सुगंधी वातावरणाचा अनुभव देणारी यंत्र गाडीत बसविण्यात आली आहेत. नेत्रहीन प्रवाशांच्या सुविधेसाठी ब्रेल लिपीमध्येही आसनांवर क्रमांक टाकण्यात आले आहेत. खिडक्यांना पडदे, प्रत्येक डब्यात माहिती दर्शविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फलक लावण्यात आले आहेत.

स्वच्छतागृहाच्या रचनेतही विविध बदल करण्यात आले आहेत. विविध नव्या सुविधांसह स्वच्छतागृहात आकर्षक टाईल्स बसविण्यात आल्या आहेत.

फर्शीवरून पाय घसरू नये, यासाठी विशेष प्रकारची चटईही स्वच्छतागृहात बसविण्यात आली आहे. अंतर्बा बदललेली प्रगती एक्स्प्रेस नव्या डब्यांसह ४ नोव्हेंबरला पुण्यातून सकाळी ७.५० वाजता सोडण्यात येणार आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत याबाबतच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button