Views:
141
मुंबई: पिण्यासाठी पाणी मागितल्याच्या रागातून शेजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील चारकोप भागात घडली आहे. संजय गंगातिवरे असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहिते कुटुंबातील चौघांसह पाचजणांना अटक केली आहे.
गंगावितारे आणि मोहिते कुटुंबीय चारकोपमध्ये मोहितेवाडी, भांबेरनगर येथे एकमेकांच्या शेजारी राहतात. या दोन्ही कुटुंबांमध्ये किरकोळ कारणांवरून पूर्वी वाद झाला होता. मानसिक रुग्ण असलेला गंगातिवरे कुटुंबातील संजय गुरुवारी सायंकाळी आपल्या घरी आला. घर बंद असल्यानं त्यानं मोहितेंकडं पिण्यासाठी पाणी मागितलं. याच कारणांवरून मोहिते कुटुंबीयांनी संजयला मारहाण केली. त्यात संजय गंभीर जखमी झाला. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी चारकोप पोलिसांनी कलावती सुनील मोहिते (वय ५०), तेजस्वीनी सुनील मोहिते (२५), सुनील जयराम मोहिते (५४), अजित सुनील मोहिते (२०), विजय मुकुंद गायकवाड यांना अटक केली आहे. तर विशाल मोहिते हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Like this:
Like Loading...