breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना आयोगाची नोटीस

  • सलमान खानवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

पिंपरी- “टायगर जिंदा है” या सिनेमाच्या रियालिटी शो दरम्यान अभिनेता सलमान खान याने वाल्मिकी समाजाला उद्देशून आक्षेपार्ह कॉमेंट केल्याने सलमान खानवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वाल्मिकी समाजाने केली होती. तरीही, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना नोटीस बजावली आहे.

अॅड. सागर चरण यांनी पुणे पोलीस आयुक्त शुल्का यांच्या विरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली आहे. सलमान खान याने वाल्मिकी समाजाला उद्देशून केलेली कॉमेंट व्हायरल झाल्यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे सलमान खानच्या विरोधात राजस्तान येथे तक्रार दाखल झाली. अॅड. सागर चरण यांनी कार्यकर्त्यांसह पुणे पोलीस आयुक्तांकडे खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार केली होती. मात्र, पोलीस तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने चरण यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने पोलीस आयुक्त शुक्ला यांना याबाबत नोटीस बजावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button