breaking-newsपुणे

पोलिसांचा “बडिकॉप’ उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात; महासंचालकांचा निर्णय

पिंपरी- हिंजवडी येथील आयटी परिसरात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्‍तांनी सुरू केलेला “बडीकॉप’ उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराचा प्रतिसाद पाहून हा प्रकल्प सर्व पोलीस घटकांमध्ये राबवण्याचा विचार पोलीस महासंचालक कार्यालयाचा आहे. त्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्‍तांकडून वेळोवेळी आढावा घेणे सुरू आहे.

आयटी व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षितेसाठी पुणे पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी “वॉक विथ सीपी’ हा उपक्रम सुरू केला. त्याच वेळी हिंजवडीतील काही कंपन्यातील आयटीन्सच्या पुढाकाराने “बडीकॉप’ संकल्पना सुरू करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी, पुण्यातील मगरपट्टा, खराडी या ठिकाणी पोलिसांना हा उपक्रम पहिल्या टप्प्यात सुरू केला होता. त्याचा आढावा खुद्द पोलीस आयुक्त घेत असल्याने त्या उपक्रमाची स्थानिक पोलिसांकडून वेळोवळी माहिती घेतली जात आहे.

या “बडीकॉप’च्या माध्यमातून पोलिसांनी तत्काळ त्यावर वेळोवळी कारवाई केली आहे. त्यामाध्यमातून पोलीस लागलीच तक्रारीचे दखल घेत असल्याने त्याला प्रतिसादही वाढत गेला. त्याचप्रमाणे सर्व आयटी कंपन्यांमध्ये प्रबोधन करण्यात आले होते. पुणे शहरातील प्रामुख्याने चार पोलीस ठाण्यात व्हाट्‌सऍप ग्रुप बनविण्यात आला आहे. एका बडीकॉपमध्ये पन्नास महिला व संबंधित पोलीस ठाण्यात अधिकारी असल्याने त्यावर प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाते. त्यामुळे महिलांना कोणत्याही प्रकाराची मदत हवी असल्यास पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याऐवजी बडीकॉपवर सांगितल्यास अवघ्या काही मिनीटांत घटनास्थळी पोलीस पोहचतात.

पुण्यातील बडीकॉप उपक्रमाची माहिती अनेक पोलीस घटकांनी घेतली आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयात हा उपक्रम सुरू केला आहे. तसेच, कोल्हापूर परिक्षेत्रातील जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्याचा विचार आहे. त्याच प्रमाणे या उपक्रमाची पोलीस महासंचलाकाने दखल घेतली आहे. त्यानुसार हा उपक्रम राज्यातील विविध जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.

पोलीस उपायुक्तांकडून आढावा…
पुणे शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या या उपक्रमाची वेळोवळी पोलीस आयुक्तालाय कार्यालयाकडून आढावा घेणे सुरू असते. वाकड, हिंजवडी, तळवडे या पट्ट्यातील आयटी कंपनातीला माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्तांकडून तर, हडपसर, खराडी, येरवडा येथील माहिती परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांकडून घेण्यात येते. त्यात आलेल्या तक्रारी आल्या तसेच, त्याचा निपटारा घेण्यासाठी काही उपाययोजना केल्या त्याची माहिती द्यावी लागते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button