breaking-newsराष्ट्रिय
पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये 7 पैशांनी कपात

नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी कपात झाली. पेट्रोलच्या दरामध्ये लीटरमागे 7 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये 5 पैशांनी कपात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमती घटल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही दरकपात करण्यात आली. दिल्लीमध्ये आता पेट्रोल 78.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 69.25 रुपये प्रति लीटर असणार आहे. स्थानिक विक्री कर किंवा व्हॅट लागू झाल्यावर हे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असणार आहेत..
सलग 16 दिवस दरवाढ होत राहिल्यानंतर काल पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रत्येकी 1 पैशाची कपात करण्यात आली होती.