breaking-newsराष्ट्रिय

पेट्रोल-डिझेलच्या दरात 1 पैशांनी घट ही जनतेची चेष्टा – राहुल गांधी

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फक्त 1 पैशांची कपात ही जनतेची क्रूर थट्टा असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी करत मोदी सरकारवर निशाना साधला आहे.  पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन याआधीही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते. मात्र, आता सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फक्त 1 पैशांची कपात केल्याने राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन ही जनतेची क्रूर चेष्टा असल्याची टीका केली.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशातील सर्व नागरिक त्रस्त आहेत. त्याचबरोबर, महागाई आकाशाला भिडली आहे. असे असताना दर कमी करण्याची ही पद्धत आहे का? असे असेल तर हा अतिशय बालिशपणा आणि जनतेची क्रूर थट्टा आहे. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला तेलाचे दर कमी करण्याचे आव्हान दिले होते. मात्र फक्त 1 पैशांनी दर कमी करून तुम्ही ते आव्हान अजून स्वीकारलेले नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi

@RahulGandhi

Dear PM,

You’ve cut the price of Petrol and Diesel today by 1 paisa. ONE paisa!??

If this is your idea of a prank, it’s childish and in poor taste.

P.S. A ONE paisa cut is not a suitable response to the I threw you last week. https://twitter.com/ndtvvideos/status/1001735184981475334 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button