पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा कपात

पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरांमध्ये आज पुन्हा एकदा कपात झाली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर १९ पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर १२ पैशांनी कमी झाले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर ८४ रुपये ४९ पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ७७ रुपये ६ पैसे झाला आहे. दिल्लीतही पेट्रोलचे दर १९ पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर ७८ रुपये ९९ पैसे प्रति लिटर असेल तर डिझेलच्या किंमती प्रति लिटर ११ पैशांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर ७३ रुपये ५३ पैसे झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
मागील १५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किंमतीत काही अंशी का होईना घट होताना दिसते आहे. पेट्रोलच्या किंमती नव्वदी पार करतात की काय असे वाटत होते तर डिझेलच्या किंमतीही ८० ते ८१ रुपये प्रति लिटर पर्यंत जाऊन ठेपल्या होत्या. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरांमध्ये कपातच बघायला मिळते आहे.