breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पुन्हा एकदा पंतप्रधानांची शिवाजी महाराजांशी तुलना; भाजपा नेत्याने दिली मोदींना ‘छत्रपती’ उपमा
नवी दिल्ली | महाईन्यूज
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाला झटका मिळालेला असतानाही भाजपाच्या उपाध्यक्षा उमा भारती यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करताना नव्या वादाला तोंड फोडलेलं आहे. मोदींशिवाय भाजपामध्ये कोणताही सक्षम नेता नाही, सर्व लोकांना फक्त मोदी हवे आहेत. असं सांगत नरेंद्र मोदी यांना छत्रपती मोदी जिंदाबाद असं म्हणल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. आज के शिवाजी नरेंद्र मोदी नावाने भाजपा नेते जयभगवान गोयल यांनी पुस्तक प्रकाशित केलेले होते. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीची लाट उसळली होती. अनेकांनी या पुस्तकावर नाराजी व्यक्त करत भाजपाविरोधात संताप व्यक्त केला होता.