breaking-newsराष्ट्रिय

‘पुतळ्यांच्या देशा’! सर्वाधिक उंच पुतळ्यांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी

भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे आज लोकार्पण होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती आहे. त्याचेच औचित्य साधत या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. सरदार पटेल यांचे हे शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प आहे. या पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे. या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यावरून मतमतांतरे आहेत. स्थानिक गावकऱ्यांसहीत काही जणांनी या पुतळ्यासाठी करण्यात आलेल्या खर्चावर आक्षेप नोंदवला आहे. असे असले तरी हा पुतळा उभारण्याआधीपासूनच भारतामध्ये ३० मीटरहून अधिक उंच पुतळ्यांची संख्या २० हून अधिक आहे. ३० मीटरहून अधिक उंच पुतळे असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये २५ पुतळ्यांसहीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. ३० मीटरपेक्षा जास्त उंचीचे सर्वाधिक पुतळे चीनमध्ये आहेत. चीनमध्ये ३४ पुतळ्यांची उंची ३० मीटरहून अधिक आहे.

जगभरात एकूण १३९ पुतळ्यांची उंची ३० मीटर किंवा त्याहून अधिक आहे. यापैकी चक्क ४२ टक्के पुतळे हे चीन आणि भारतामध्ये आहेत. विशेष म्हणजे या यादीमधील अव्वल पाच देशांपैकी चार देश हे अशिया खंडातील आहेत. यामध्ये चीन व भारतापाठोपाठ २० पुतळ्यांसहीत जपान तिसऱ्या स्थानी तर १० पुतळ्यांसहीत तैवान चौथ्या स्थानी आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशामध्ये ३० मीटरहून अधिक उंची असणारे केवळ ५ पुतळे आहेत.

विशेष म्हणजे भारतामधील नियोजित पुतळ्यांचा विचार केला तर येत्या काही वर्षात भारत ३० मीटरपेक्षा उंच पुतळ्यांच्या यादीमध्ये चीनलाही मागे टाकेल. सध्या देशभरातील नियोजित पुतळ्यांपैकी सर्वच पुतळे हे ३० मीटरहून अधिक उंचीचे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button