breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुण्यात १० वर्षांच्या मुलीसमोरच वडिलांनी केली आईची हत्या

१० वर्षांच्या मुलीसमोरच वडिलांनी आईची वायरने गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या पिंपरीत घडला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. उत्तम जाधव असं या नराधम आरोपीचे नाव आहे. उत्तम जाधवचा मेहुणा पुंडलिक वाघमारे याने या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वंदना उत्तम जाधव असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी उत्तम जाधववर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी उत्तम जाधव हा त्याची पत्नी वंदना आणि मुलांना दारू पिऊन मारहाण करत असे. या दोघांमध्ये कायमच वाद होत असत. उत्तम जाधव आणि वंदना या दोघांना ओंकार आणि दीपाली अशी दोन मुलं आहेत. बुधवारी उत्तम दारू पिऊन घरी आला. त्यावेळीही त्याने पत्नी वंदना आणि मुलांना मारहाण केली. बुधवारी रात्रीही असाच प्रकार घडला. मुलांना आणि पत्नी वंदनाला उत्तमने जेवणही करू दिले नाही. त्यानंतर वंदनाने कसेबसे मुलांना झोपवले. मध्यरात्री उत्तम हातात वायर घेऊन आला. त्याने त्याच्या दहा वर्षांच्या मुलीसमोर पत्नीचा गळा त्या वायरने आवळला आणि ज्यामुळे वंदनाची शुद्ध हरपली. वंदनाला बेशुद्ध अवस्थेत त्याने मोरीत ढकलले आणि घराच्या दरवाजाला कडी लावून तो फरार झाला.

या प्रकारानंतर मुलांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना जागं केलं. शेजारी मदतीसाठी आले, त्यांनी बेशुद्ध अवस्थेतल्या वंदनाला रूग्णालयात दाखलही केलं. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी उत्तम जाधववर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button