Views:
167
पुणे- पुण्यात एक विचित्र अपघात घडला आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हॉटेलमध्ये कार घुसली. या अपघातात हॉटेलमधील एका वेटरचा मृत्यू झाला असून कारचालक आणि महिला जखमी झाली
पुण्यात सोमवारी दुपारी एक विचित्र अपघात घडला आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसली. पुण्यातील सांगवी परिसरातील फेमस चौकात दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला. एका वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट अनंत भोजनालयात घुसली.
या अपघातात हॉटेलमधील एका वेटरचा मृत्यू झाला असून कारचालक आणि महिला जखमी झाली आहे. सुदैवाने यावेळी भोजनालयात कोणीही नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. सचिन जाधव असे चालकाच नाव आहे. गाडीत मुलगा, महिला आणि चालक होता. कारचालक सचिन आणि महिला जखमी झाले आहेत. निखिल पुरोहित असे गाडीच्या मूळ मालकाचे नाव आहे. मृत व्यक्तिचे नाव समजलेले नाही.
Like this:
Like Loading...