breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना गोरक्षकांकडून मारहाण

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आरोप असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना मंगळवारी रात्री सासवडमध्ये गोरक्षकांकडून मारहाण झाली असून याप्रकरणी पोलिसांनी ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिलिंद एकबोटे सासवडमधील झेंडेवाडीत एका कार्यक्रमासाठी गेले असता तिथे ४० ते ५० जणांनी एकबोटे यांच्यावर हल्ला केला. एकबोटे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्यावर मिरचीपूडही फेकण्यात आली. याप्रकरणी एकबोटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह त्यांच्या ४० ते ४५ समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पंडित मोडक हे सासवडमध्ये गोशाळा चालवतात तर एकबोटे हेसुद्धा स्वत: गोरक्षक म्हणून वावरतात. मोडक आणि एकबोटे पूर्वी एकत्र काम करायचे. मात्र काही महिन्यांपूर्वी एकबोटे यांनी फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमुळे या दोघांत वादाची ठिणगी पडली होती. मोडक गोशाळा चालवतो आणि जनावरांच्या गाड्या पकडून देऊन भ्रष्टाचार करतो, असा दावा एकबोटे यांनी या पोस्टमध्ये केला होता. त्याच रागातून मोडक व त्यांच्या समर्थकांनी एकबोटे यांच्यावर हल्ला केला असावा, असे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.
झेंडेवाडीतील मंदिरात एका कार्यक्रमासाठी एकबोटे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोडक व त्यांचे समर्थक आधीपासूनच तिथे दाखल झाले होते. तिथे मोडक यांनी फेसबुक पोस्टमधील आरोपाबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता एकबोटे व मोडक यांच्या समर्थकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान, मंदिरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणली, असे घोलप यांनी पुढे नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button