breaking-newsपुणे
पुण्यात स्मृती इराणी यांच्या विरोधात फसवणुकीचा खटला दाखल

पुणे – भाजपच्या नेत्या स्मृती इराणी या अमेठीमधून निवडणूक लढवित असून २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी विरोधकाकडून स्मृती इराणी यांना लक्ष केले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात आज फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.
मनसेच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा अॅड रूपाली पाटील ठोंबरे आणि विजय सिंह ठोंबरे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. एस. गायकवाड यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.आता यावर न्यायालय कोणत्या प्रकारचा आदेश देतात याकडे लक्ष लागले आहे.