Mahaenews

पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

Water supply in Mumbai will be completely cut off from October 5 to 6

Water supply in Mumbai will be completely cut off from October 5 to 6

Share On

पुणे – शहराच्या मध्यवस्तीला पाणीपुरवठा होणाऱ्या पर्वती जलकेंद्राचे पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग येथील विद्युत पंपिंगविषयक व स्थापत्यविषयक अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी येत्या गुरुवारी (दि. ५) संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग), वडगाव जलकेंद्र परिसर, चतु:शृंगी, एसएनडीटी परिसर, शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी , राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट, पर्वतीदर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी रोड, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, कोंढवा खुर्द आदी सर्व भागांत पाणी येणार नाही. वडगाव जलकेंद्र परीसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुदु्रक, एस.एन.डी.टी व वारजे जलकेंद्र परीसरातील पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी, परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक, नगर, रामबाग कॉलनी, डावी, उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, , लष्कर जलकेंद्र भाग सातववाडी, नवीन होळकर पंपींग भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शुक्रवारी (दि. ६) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. याशिवाय पर्वती टँकर भरणा केंद्र व पद्मावती टँकर भरणा केंद्र देखील बंद राहणार आहे.

Exit mobile version