breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील IPL सामन्यांसाठी धरणाचे पाणी देऊ नये, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई/पुणे-पुण्यातील आयपीएल सामन्यांसाठी धरणाचे पाणी देऊ नये, असा आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. यामुळे गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमवर होणार्‍या आयपीएल सामन्यांवर नवे संकट ओढावले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याला विरोध करत एका स्वयंसेवी संस्थेने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने राज्य सरकारला आदेश दिला.

काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने गहुंजे स्टेडीयमवर होणा-या आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार? असा प्रश्न विचारत एमसीएला (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन) याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. या वादाता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली होती आणि खडकवासला धरण प्रणालीतील पाणी आयपीएलसाठी देण्यास मनसेचा विरोध करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले होते.

पाणी प्रश्नावरुनच पुण्याला हलवले होते सामने
मनसे ने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले होते की, कावेरी पाणी वाटप प्रश्नावरुन चेन्नईतील वातावरण पेटले आहे. त्याचा फटका आयपीएल सामन्यांनाही बसला असून चेन्नईतील दुस-या सामन्यात काही आंदोलकांनी खेळाडूंवर बूट फेकले होते. त्यानंतर चेन्नईचे सर्व सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमला हलवण्याचा निर्णय आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने घेतला आहे. कारण मागील काही दिवसांपासून पाणी कपात करणार असल्याचे संकेत मंत्र्यांकडून मिळत आहेत. अशा परिस्थितीत पुणेकरांचे हक्काचे पाणी पळवण्याचा विचार झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र विरोध करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button