breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे होणार “स्मार्ट सॅनिटेशन सिटी’

  • जगातील पहिला प्रकल्प महापालिका उभारणार

 
पुणे:  अवघ्या काही दशकांपूर्वी पर्यावरणामुळे पुणे शहरात स्थायिक होण्याला राज्यभरातून पसंती दिली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांत वाढलेले बेसुमार वायू तसेच जलप्रदूषण आणि स्वच्छतेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असल्याने शहरातील नागरिकांनी दरवर्षी वेगवेगळ्या साथींच्या आजारांचा समाना करावा लागत आहे. अशा भविष्यात येऊ शकणाऱ्या संभाव्य आजारांची आधीच माहिती मिळाल्यास त्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेने “स्मार्ट सॅनिटेशन’ प्रकल्प हाती घेतला आहे.

स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित अशा प्रकारचा “स्मार्ट सॅनिटेशन’ प्रकल्प हाती घेणारी पुणे ही जगातील पहिलीच महापालिका ठरली असून त्यासाठी जिनिव्हा येथील “टॉयलेट’ या संस्थेशी करार करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात पुणे शहराची ओळख ही “स्मार्ट सॅनिटेशन सिटी’ म्हणून होणार आहे. त्यात प्रामुख्याने सार्वजनिक स्वच्छतागृहांमुळे निर्माण होणारे आजार, त्यांचा प्रसार याला पायबंद घालण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.

 

गेल्या काही वर्षात शहरात वेगवेगळया साथींच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी महापालिकेकडून वेळोवेळी वेगवेगळया उपाय योजना केल्या जातात. मात्र, अशा साथी पसरण्याआधीच त्याला पायबंद घातल्यास शहराच्या सार्वजनिक आरोग्यासाठी ते परिणामकारक ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून जगातील पहिला स्मार्ट सॅनिटेशन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी जिनीव्हा येथील संस्थेशी करार करण्यात आला असून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे.- डॉ. अंजली साबणे ( सहयक आरोग्य प्रमुख)

काय आहे प्रकल्पाचा प्रमुख उद्देश?
शहरात सार्वजनिक आरोग्याशी थेट संबध असलेले आजार हे सार्वजनिक स्वच्छतागृहांमुळे पसरण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या ठिकाणी हायजीन सेंटर उभारली जाणार असून त्या माध्यमातून स्वच्छतागृहाच्या संवेदकाचा वापर केला आहे. त्या सोबतच हेल्थ इंडीकेटर निश्‍चित करून त्या अभ्यासाआधारे वेगवेगळे रोग आणि व्याधींचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे संभाव्य तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या आजारांची माहिती आधीच महापालिकेस उपलब्ध होणार असून त्याद्वारे या आजारांना उद्भवण्या आधीच पायबंद घालण्यासाठी उपाय योजना करणे शक्‍य होऊन साथीचे तसेच जीवघेणे आजार रोखण्यास मदत होणार आहे.

 

 

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या ठिकाणी हायजीन सेंटर उभारली जाणार आहेत.या शिवाय, या ठिकाणी आरोग्य संवेदके ( हेल्थ इंडीकेटर्स) बसविले जाणार आहेत. या शिवाय, महापालिकेच्या मैलापाणी शुध्दीकरण केंद्रासाठी अत्याधुनिक यंत्रणा पुरविली जाणार असून हे पाणी जास्तीत जास्त स्वच्छ ठेवले जाणार आहे. त्या शिवाय, या प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिकेच्या हद्दी नजिकच्या निमशहरी भागांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांचीही उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून शासनाच्या आरोग्य विभागाची मदतही घेतली जात असून सार्वजनिक आरोग्य व शौचालयाशी संबधित निर्देशांक व संबधित आजारांबाबत तज्ज्ञांची चर्चासत्रे आयोजित करण्यात येत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button