breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे मेट्रो प्रकल्पास मिळणार गती

केंद्राची अर्थसंकल्पीय निधीची तरतुद जाहीर

पिंपरी : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरु असलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात निधीची तरतुद केली आहे. यामूळे मेट्रो प्रकल्पाला गती मिळणार आहे. यामध्ये नागपूर मेट्रो प्रकल्पास १५०७ कोटी रुपये तर पुणे मेट्रो प्रकल्पास १३२२ कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्पात केली आहे. एकंदरित दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे २८२९ कोटी रुपये केंद्राने अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी ३१० कोटी तर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३० कोटी रुपयांची तरदूत केली होती. मागील आर्थिक वर्षात नागपूर मेट्रो प्रकल्पाकरिता २६० कोटी तर पुणे मेट्रो प्रकल्पाकरिता ११० कोटी रुपय मंजूर करण्यात आले होते . एकंदरीत मागील वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात राज्य सरकारने दोन्ही प्रकल्पाना मिळून ७० कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला आहे.

नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या १५०७ कोटी रुपयापैकी २७९ कोटी रुपये इक्विटी अंतर्गत, १८५ कोटी रुपये सबोर्डिनेटेड डेट (एसडी) – केंद्र सरकार तर्फे लावलेल्या कर्जाच्या निमित्याने आणि उरलेली १०४३ कोटी रुपये केएफडब्ल्यू आणि एएफडी तर्फे कर्जस्वरूपात प्राप्त होतील. तसेच पुणे मेट्रो प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या १३२२ कोटी रुपयापैकी २५० कोटी रुपये इक्विटी अंतर्गत, १६९ कोटी रुपये सबोर्डिनेटेड डेट (एसडी)- केंद्र सरकार तर्फे लावलेल्या कर्जाच्या निमित्याने आणि उरलेली ९०३ कोटी रुपये ओव्हर सिझ डेव्हलपमेंट असिस्टंस (ओडीए) कर्जस्वरूपात मिळतील.

गेल्या वर्षी २०१८-१९ या आर्थिक वर्षात सादर झालेल्या अर्थ संकल्पात नागपूर आणि पुणे अश्या दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी अनुक्रमे १३५० आणि ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. तर यंदाच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थ संकल्पात नागपूर आणि पुणे अश्या दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी अनुक्रमे १५७ कोटी आणि ८२२ कोटी रुपयांची वाढीव तरतूद केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button