पिंपरी / चिंचवडपुणे

पुणे मेट्रो निगडी-दापोडी रस्त्याच्या मध्यभागातून जाणार; आखणीत फेरबदल

पुणे: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्ग करण्याचे नियोजन केले होते. तथापि, महापालिकेने पिंपरी ते दापोडी रस्ता विकसीत करताना केलेल्या कामाच्या तांत्रिक बाबींचा विचार करुन पुणे मेट्रोने मागणी केलेल्या आखणीत फेरबदल सुचविले आहेत. त्यानुसार पुणे मेट्रो महामार्गावरुन निगडी-दापोडी रस्त्याच्या मध्यभागातून जाणार आहे. 
 महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्ग करण्याचे नियोजन केले होते. फुटपथाच्या कडेने मेट्रोचे काम केले असता अनेक त्रुटींचा यामध्ये अंतर्भाव असल्याचे पालिकेच्या अधिका-यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यामध्ये अस्तित्वामधील फुटपाथ मधील सेवावाहिन्या स्थलांतरित कराव्या लागणार होत्या. सेवा रस्त्यांची रुंदी कमी होणार होती. तसेच वाहतूक कोंडीची दाट शक्यता होती.
 मेट्रो स्टेशनसाठी पाच ते सात मीटर रुंद व 140 मीटर लांब क्षेत्राच्या भूसंपादनाची आवश्यकता होती. त्यामुळे प्रकल्पाला उशीर होणार होता. त्याचबरोबर  650 झाडे काढावी लागणार होती. याचा विचार करुन एक्सप्रेस लेन व बीआरटीएस लेनच्या मधील 2 मीटर  रुंद दुभाजकामधून मेट्रो मार्गाची आखणी करण्यात आली आहे. तसेच महा मेट्रो कॉर्पोरेशनने महापालिकेची मागणी तांत्रिकदृष्टया योग्य असल्याचे मान्य केले आहे. पुणे मेट्रो मार्गाची आखणी पिंपरी-दापोडीच्या रस्त्याच्या मध्यभागातून निश्चित केले आहे. याबाबत महापालिका देखील सकारात्मक आहे.
 मेट्रोमुळे निगडी-दापोडी या रस्त्यावर बीआरटी, मेट्रो, लोकल या वाहतुकीच्या तिन्ही पर्यायामुळे एकात्मिक वाहतुक, नियोजन करणे सोपे होणार आहे. महापालिका हद्दीमधील अंतर 7.15 किलो मीटर असणार आहे. मेट्रो फेरीची सरासरी 3.30 मिनिटे असणार आहे. एका फेरीची प्रवासी संख्या 900 असणार आहे.
 … इथे असणार मेट्रोचे स्टेशन! 
 1)पिंपरी, 2) संत तुकारामनगर, 3) भोसरी (नाशिक फाटा), 4) कासारवाडी (फोर्ब्ज मार्शल समोर), 5) फुगेवाडी (जकात नाका समोर), 6) दापोडी (अरुण टॉकीज) येथे मेट्रो स्थानक होणार आहेत.
 पुणे मेट्रो मध्यभागातून आखणीचे फायदे!
फुटपाथ मधील सेवावाहिन्या स्थलांतरित करण्याची आवश्यकता नाही. बीआरटीएस लेन अखंडीत राहणार, सेवा रस्ते अखंडीत राहणार, वाहतूक कोंडी कमी होणार, भूसंपादनाची गरज नसल्याने प्रकल्प नियोजित कालावधीमध्ये पुर्ण होणार, कमीतकमी झाडे काढावी लागणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button