breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पुगावच्या विकासकामांसाठी खासदार अमर साबळे यांचा पुढाकार

खासदार निधीतून दिले 15 लाखांचे अनुदान
पिंपरी – कोल्हापूर जिल्ह्यातील पुगाव या गावातील सर्वांगीण विकासासाठी राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी पुढाकार घेतला. आपल्या खासदार निधीतून 15 लाखाचे अनुदान या गावासाठी देणार आहेत. तसे पत्र कोल्हापुरच्या जिल्हाधिका-यांना पाठवून पुगाव गावातील विकासकामे आपल्या निधीतून करण्याची सूचना केला आहे.
राधानगरी तालुक्यातील पुगाव हे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दत्तक घेतले आहे. या गावाचा विकास व्हावा. यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, महिला सरचिटणीस संजीवनी पांडे, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, संजीवनी पांडेय, पुंगावचे सुभाष परिट, राजेंद्र पाटील, भूषण भांदिगरे, विश्वास पाटील, प्रकाश पाटील, भगवान धनवडे, भिकाजी बरगे, संतोष कांबळे यांच्या शिष्टमंडळाने खासदार साबळे यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने खासदार साबळे यांची भेट घेऊन पुगावच्या विविध विकासकामांबाबत चर्चा झाली. त्यानंतर पुगावच्या विकासकामांसाठी 15 लाख रुपयांचा निधी देण्याची तयारी खासदार साबळे यांनी दर्शविली. त्यानुसार त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिका-यांशी पत्रव्यवहार केला आहे. आपल्या खासदार निधीतून पुगावातील विकासकामे सुरू करण्याची सूचना त्यांनी पत्राव्दारे केली आहे.