breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘पीएमपी’ बस ‘सेफ्टी ऑडिट’चे शहाणपण!

  • पीएमपी बसेसना गेल्या काही महिन्यांत मार्गावर तसेच डेपोमध्ये आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. यावर बसचे “फायर सेफ्टी ऑडिट’ झाले आहे का? हा प्रश्‍न उपस्थित होऊन त्यावर निर्णयासाठी समिती गठीत करण्यात आली. या समितीने सर्व बसेसचे फायर सेफ्टी ऑडिट करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार निर्णय होऊन बसेसचे आता खासगी संस्थेकडून फायर सेफ्टी ऑडिट करुन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अखेर पीएमपी प्रशासनाना उशिरा का होईना, हे शहाणपण सूचल्याचे स्पष्ट होत आहे.

पीएमपी बसेसचे सेफ्टी ऑडिट करण्यासाठी सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर पिंपरी डेपोची निवड करण्यात आली आहे. यानंतर हे काम पाहून उर्वरित बसेसचे ऑडिट करण्यात येणार आहे. पीएमपी ही पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा आहे. पीएमपी बसने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे 11 लाख आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपीची बसेसची संख्या कमी आहे. पीएमपीच्या स्वतःच्या सुमारे 1 हजार 400 तर ठेकेदारांच्या 653 बसेस आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये पीएमपी बसेसला मार्गावर आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

गेल्या आठ महिन्यांत जवळपास 9 बसेसनी पेट घेतला. काही दिवसांपूर्वी विमाननगर येथे पीएमपी बसला मोठी आग लागली होती. यामुळे पीएमपीच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. यातून पीएमपीच्या किती गाड्यांचे फायर सेफ्टी ऑडिट पूर्ण आहे, असा सवाल उपस्थित झाला. यानंतर बस पेटण्याचे नेमके कारण काय? हे तपासण्यासाठी आरटीओ बाबासाहेब आजरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली. त्यांनी सर्व बसेसचे ऑडिट पूर्ण करण्याचे सूचविले. त्यानूसार पीएमपीने महापालिकेसमोर फायर ऑडिटची मागणी केली. त्यावर महापालिकेने फायर ऑडिट करणाऱ्या काही खासगी संस्थांची यादी पीएमपी प्रशासनाला दिली.

यामधील एका संस्थेने पीएमपी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालिक नयना गुंडे यांच्यासमोर कशा प्रकारे फायर सेफ्टी ऑडिट केले जाईल, याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले आहे. त्यानुसार या संस्थेला प्रायोगिक तत्वावर पिंपरी डेपोचे काम देण्यात आले आहे. त्यानुसार येणाऱ्या काळात तरी या बस सुरक्षित असतील, अशी अपेक्षा करता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button