breaking-newsपुणे

‘पीएमपी’ कर्मचारी-प्रवासी समन्वय वाढण्याची गरज

  • परिसंवादातील सूर

  • कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलणे आवश्‍यक

पुणे- गेल्या काही दिवसांपासून “पीएमपी’चे चालक, वाहक आणि प्रवाशांमध्ये विविध कारणांवरुन वाद वाढले आहेत. यातील काही वाद टोकाला गेल्याने चालक, वाहकांचे निलंबन करावे लागले आहे. काळाच्या ओघात प्रवाशांच्या मानसिकतेबरोबर कर्मचाऱ्यांनी सुध्दा स्वत:मध्ये बदल करणे गरजेचे असून वाद टाळण्यासाठी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय वाढण्याची गरज आहे, असा सूर शनिवारी आयोजित परिसंवादात उमटला.

“पीएमपी’ चालक आणि वाहक हे समाजाचा भाग आहेत. मात्र त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे, तरच त्यांच्यामध्ये बदल घडू शकतो. यासाठी प्रशासनाने आता प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे सुरू केले असून नियमांमध्ये काय कठोरपणा आणता येईल, यावर विचार सुरू आहे.
– विलास बांदल, महाव्यवस्थापक, पीएमपीएमएल.

सजग नागरिक मंचप्रणित पीएमपी प्रवाशी मंचच्या वतीने “पीएमपी व पोलीस प्रशासनाची संवेदनशीलता या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाची संवेदनशीलता हरवते आहे की काय?’ यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे, महाव्यवस्थापक विलास बांदल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, “पीएमपी’ प्रवासात अनुभव आलेले प्रवासी हणमंत पवार आदी सहभागी झाले होते. यावेळी प्रवासी मंचाने काही व्यक्तींना मोफत पासचे वाटप करण्यात आले.

शिरोळे म्हणाले, काळ बदलत असून काळाच्या ओघात “पीएमपी’ कर्मचाऱ्यांमध्ये प्रबोधन करुन त्यांची मानसिकता बदलण्यावर भर देणे सुरू केले आहे. प्रवासी व प्रशासन यांच्यात समन्वय वाढण्याची गरज आहे. समन्वय वाढल्यास प्रश्‍न सुटण्यास नक्कीच सहकार्य होईल. यासाठी “पीएमपी’ कर्मचाऱ्यांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम, जनजागृती मोहिमेसारख्या कार्यक्रमांवर भर द्यावा लागणार आहे.

घटना कोणतीही असो, पोलिसांनी अगोदर आपण कोणासाठी काम करतोय हे समजून घ्यावे, तरच नागरिकांना समजावून घेणे सोपे होईल, असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांनी व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे स्वागत विवेक वेलणकर यांनी तर आभार जुगल राठी यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button