breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पीएमपीकडून शहरात सहा मार्गावर बस सुरु

पिंपरी ( महा ई न्यूज )-  पिंपरी-चिंचवड महापालिका नगरसेवकांनी बैठकीत तक्रारींचा पाढा वाचल्याने अखेर पीएमपीएमएल प्रशासनाने नवीन मार्गावर बस सुरू केल्या आहेत. शहरात नव्याने हिंजवडी, देहूगाव, चिखली आणि पिंपळे निलखमधील नागरिकांच्या सोयीसाठी नव्याने सहा मार्गावर बस सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच, शहरातील पीएमपी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची ग्वाही देखील पीएमपी प्रशासनाने दिल्याचे महापौर राहूल जाधव यांनी सांगितले.

पीएमपी प्रशासनाने नव्याने सहा मार्गावर पीएमपी बसेस सुरू केल्या आहेत.  निगडी – देहूगाव -निगडी (तळवडे, देहूरोडमार्गे) हा वर्तूळाकार मार्गावर दहा बस सुरू केल्या आहेत. पुणे मनपा ते शिवसृष्टी चौक ही बस जाधववाडी (चिखली) पर्यंत विस्तारित केली जाणार आहे. भोसरी ते हिंजवडी (वायसीएम-काळेवाडी-थेरगाव मार्गे) नवीन बसमार्ग, पिंपळे निलख ते निगडी (विशानगर, कस्पटे वस्ती, थेरगाव, चिंचवडमार्गे) हे दोन मार्ग सुरू केले जाणार आहेत. शहरातील नागरिकांना  नव्याने सुरू झालेल्या या बसमार्गाचा फायदा होईल. तसेच, पीएमपीकडून बस संचलन व्यवस्थितरित्या होणे आवश्यक असल्याचे महापौर जाधव यांनी म्हटले आहे. शहराबरोबर येत्या 5 नोव्हेंबरपासून पिंपरीगावातून दोन नवीन बस सुरू करण्यात येणार आहेत. पिंपरीगावातून काळेवडी, डांगे चौकमार्गे हिंजवडी फेज थ्रीपर्यंत बससेवा सुरू होणार आहे. तर, पिंपरीगावातून हडपसर शेवाळवाडी बस सुरू होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button