breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पीएमपीएमएल’ साठी महापालिका खरेदी करणार बसेस

– पीएमपी मागणी आणि स्पेसिफिकेशन नूसार बस खरेदीला महासभेची मान्यता

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी बसेस खरेदीचा धोरणात्मक पीएमपीएमएल निर्णय घेतला. त्या बसेस खरेदीला दोन्ही महापालिकांनी निधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज ( बुधवारी) झालेल्या महासभेत बसेस खऱेदीला ग्रीन सिग्नल दिला आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापैार राहूल जाधव होते.

पीएमपीएमएलच्या सार्वजनिक बसची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना 1550 बस खरेदीची प्रक्रिया दोन वर्षे झाले रखडली आहे. दोन्ही महापालिकेत सत्ताधारी भाजपची सत्ता असूनही निधी उपलब्ध न झाल्याने बसेस खरेदीला विलंब लागत आहे. त्यामुळे बस खरेदीसाठी दोन्ही महापालिकांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी भूमिका पीएमपी प्रशासनाने घेतली आहे.

पीएमपी प्रशासनाने 1550 बस खरेदीपैकी 120 बस पुणे मनपा, तर 80 बस पिंपरी- चिंचवड महापालिका खरेदी करण्यात आलेली आहे. तसेच 550 बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी पीएमपी “एएसआरटीयू’ या शासनाच्या अंगिकृत संस्थेशी करार करण्यात येणार असून त्यावर शिक्‍कामोर्तब झालेले नाही.900 बसेस मार्केट फायनान्स मेकॅनिझमनूसार घेण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. बस खरेदीसाठी काही प्रमाणात निधी दोन्ही महापालिकांकडून पीएमपीकडे द्यावा, अशी मागणी पीएमपी प्रशासनाने केली आहे. तसेच पीएमपीच्या सुमारे 1200 पैकी 768 बस रस्त्यावर धावत आहेत. उर्वरित 432 बसपैकी 130 बसच्या किरकोळ स्वरुपाची कामे सुरु आहेत. ठेकेदारांच्या 800 पैकी सुमारे 670 बस सध्या मार्गांवर धावत आहेत. त्यामुळे एकूण सुमारे 1450 बस सध्या मार्गांवर धावत आहेत.

दरम्यान, पीएमपीएमएल सध्यस्थितीत दोनशे बसेस खरेदी झाल्याचे समजते आहे. दोन वर्षापुर्वी बसेस खरेदीला मान्यता देवूनही पीएमपी प्रशासनाकडून बसेस खरेदीस विलंब होत आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पीएमपीच्या मागणी आणि स्पेसिफिकेशन नूसार लेखा विभागाकडील बसेस खरेदी या तरतुदीमधून बसेस महापालिकेकडून खरेदी करुन पीएमपी उपलब्ध करुन देण्याच्या धोरणात्मक निर्णयास पिंपरी चिंचवड महासभेत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button