Mahaenews

पीएफवर मिळणार ८.५५ टक्के व्याजदर?

Share On

 नवी दिल्ली:  भविष्यनिर्वाह निधीतील (पीएफ) आर्थिक २०१७-१८ अखेरच्या जमा रकमेवर ८.५५ टक्के दराने व्याज देण्याच्या निर्णयावर चालू आठवड्यात केंद्रीय कामगार मंत्रालयातर्फे शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडण्ट फंड ऑर्गनायझेशन’तर्फे व्याजाची रक्कम पाच कोटी सभासदांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. हा गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी व्याजदर ठरणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे या निर्णयाची घोषणा लांबणीवर पडली. आचारसंहिता संपल्यानंतर ही रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. ‘ईपीएफओ’साठी निर्णय घेणाऱ्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने व्याजदराच्या शिफारशी कामगार मंत्रालयाकडे धाडल्या आहेत. त्यांना मंजुरी मिळाल्यानंतर हा निर्णय अंतिम समजला जाईल.

Exit mobile version