breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे निलखमधील नागरिकांना विकास कामांची “दिवाळी भेट”

  • स्थायी समितीच्या माध्यमातून विकास कामांवर भर
  • सभापती ममता गायकवाड यांचा पुढाकार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती ममता विनायक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजवरच्या स्थायी समितीमध्ये सर्वांगीन विकास कामांच्या विषयांना मंजूरी देण्यात आली. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रभाग 26 (वाकड-पिंपळे निलख) मध्ये नागरिकांच्या हिताचे महत्वपूर्ण प्रकल्प विकसित होत आहेत. शहरातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन स्थायी अध्यक्षा गायकवाड यांनी विकास कामांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

प्रामुख्याने वाकड-पिंपळे निलख परिसरात पाण्याची समस्या असल्याने यावर कायमचा उपाय म्हणून आता २४x७ अमृत योजनेअंतर्गत संपूर्ण प्रभागात नवीन पाईपलाईन टाकन्याचे काम चालू आहे. आता लवकरच या भागासाठी २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. यामुळे वाकड-पिंपळे निलखमधील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. तसेच, या भागातील रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. यामध्ये मॉडेल रोड करून नागरिकांना वाहतुकीसाठी, पायी चालण्यासाठी सुसज्ज असे सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार होत आहेत. यामध्ये कावेरी सब-वे ते पिंक सिटी कॉर्नर पर्यंत डीपी रस्ता सिमेंट काँक्रिट मार्गी लागणार आहे. काळेवाडी फाटा ते छत्रपती चौकापर्यंत रोड रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, विशालनगर वाघजाई हॉटेलपासून ते कास्पटे चौकापर्यंत २४ मी. डीपी रस्ता सिमेंट काँक्रिट करणे व वाकड पिंपळे निलखमधील अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रिटचे करणे आशा रस्त्यांची कामे विकासकामांतर्गत करण्यात येणार आहेत.

प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे असे विरंगुळा केंद्र उपलब्ध नाही. याकरिता वाकडमध्ये ज्येष्ठांसाठी प्रशस्त असे विरंगुळा केंद्र या परिसरात उभारण्यात येणार आहे. लहान मुले व नागरिकांना वाकड-पिंपळे निलखमध्ये सुसज्ज असे लिनियर गार्डनच्या धर्तीवर वेणुनगर येथे गार्डन विकसित होत आहे. कस्पटेवस्ती येथील स्मशान भूमी विकसित करून अद्ययावत करण्यात येणार आहे यामध्ये विद्युत दाहिनी सुद्धा असणार आहे. तसेच, पर्यावरणपूरक व नागरिकांना धुराचा त्रास होऊ नये म्हणून योग्य ते आउटलेट्स असणार आहेत.

आशा अनेक विकासकामांतर्गत वाकड पिंपळे निलख मधील नागरिकांना दिवाळी भेट देत आहोत. यापुढेही अनेक चांगल्या प्रकारची विकासकामे या परिसरातील नागरिकांना अनुभवायला मिळतील.

ममता गायकवाड, स्थायी समिती सभापती

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button