breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी वाघेरेमधील  ६०१ सदनिकांचा पंतप्रधान आवास प्रकल्पाला मंजूरी

– सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती
 
पिंपरी  –  केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राबवित आहे. या योजनेमधून पिंपरी-चिंचवड शहरात १० ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी च-होली, बो-हाडेवाडी आणि रावेतनंतर आणखी पिंपरी वाघेरे येथील  ३७० सदनिकांचा आवास प्रकल्पाच्या आराखड्याला महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समिती  (SLAC) २१ मे २०१८ रोजी मंजुरी दिली आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेत एकनाथ पवार यांनी दिली आहे.
आर्थिक दुर्बल घटकांसाठी परवडणार्‍या घरांसाठी या इमारती पालिका बांधणार आहे. तसेच शहरात सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार इमारती बांधण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश सर्वच नागरिकांना व अर्जदारांना या योजनेत सदनिका उपलब्ध होणार आहे. शहरातील मौजे पिंपरी वाघिरे येथील आरक्षण क्रमांक ७७ येथे ३७० घरे व आरक्षण क्रमांक ७९ येथे २३१ घरे बांधणेच्या प्रकल्पाचा डीपीआर म्हाडा कार्यालय मुबंई यांच्याकडे ९ मे २०१८  रोजी  पाठविण्यात आला होता.  त्याला महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समिती(SLAC) ने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पिंपरी वाघेरे येथील जागेत देखील आवास योजनेअंतर्गंत सदनिकांचे काम सुरू होणार आहे.
शहरात १० ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी चर्‍होलीत १ हजार ४४२, रावेतमध्ये १ हजार ८०, बोर्‍हाडेवाडीमध्ये १ हजार ४०० आणि आकुर्डीमधील ५०० सदनिकांच्या प्रकल्पांचे प्रकल्प आराखडे मंजूर झाले आहेत. त्यापैकी  चर्‍होली व रावेत येथील इमारत उभारण्याचा कामे स्थायी समितीने मंजूर केलेले आहेत. बो-हाडेवाडीची निविदाप्रक्रिया सुरू आहे. इतर प्रकल्पांच्या कार्यवाहीला गती दिली जाणार असून लवकरात लवकर घरे उपलब्ध करून देण्याचा भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाचा आहे, असे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button