breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी पोलिसांची दमदार कामगिरी ; नऊ सराईत गुन्हेगारांकडून 15 गुन्ह्यातील 14 लाखांचा एेवज जप्त

पिंपरी –  शहरात मोबाईल चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, सोने चोरीच्या घटना झाल्या होत्या. त्यात पिंपरी पोलिसांनी नऊ सराईत आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये 11 तोळे 3 ग्रॅम सोने-चांदीचे दागिने 23 मोबाईल फोन, 3 देशी बनावटीचे पिस्टल, 3 जिवंत काडतुसे, 2 सेन्ट्रो कार, 1 स्विफ्ट कार, 1 करिझमा मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण १४ लाख ७ हजार ७२५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. यातील 7 गुन्हेगारांकडून 15 गुन्हे उघड करुन त्यांच्या मुसक्या आवळण्यात पिंपरी पोलिसांना यश मिळाले आहे. 

पिंपरी पोलिसांनी सुरजितसिंग राजपालसिंग टाक (रा. बिराजदार नगर, हडपसर), हर्षल गुलाब पवार (रा. कुळे, ता. मुळशी), महेश शिवदास दिक्से (वय 28, रा. लोणी, ता. रिसोड, जि. वाशीम), सॅम्युअल उर्फ विशाल डेडली ऑरनॉल्ड (वय 30, रा. संभाजीराव हाऊसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी), अतुल अविनाश पवार (वय 25, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी), सागर कुमार इंद्रा (वय 25, रा. कैलासनगर, बालाजी कॉलनी, थेरगाव, काळेवाडी), राहुल श्रीहरी काळे (वय 34, रा. बुधवार पेठ, पुणे), अक्षय आबासाहेब कोळेकर (वय 19, रा. साने कॉलनी, साने चौक, मोरेवस्ती, चिखली), शुभम नितीन काळभोर (वय 19, भीमशक्ती नगर, स्पाईन रोड झोपडपट्टी, मोरेवस्ती चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बुधवार (दि. 9) रोजी क्षेत्रवन अपार्टमेंटमध्ये काही इसम घुसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अपार्टमेंटमध्ये प्रवेश केलेले इसम घरफोडी करण्याच्या तयारीत असल्याचे समजताच पिंपरी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून सुरजितसिंग याला ताब्यात घेतले. अन्य तिघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. सुरजितसिंगकडे कसून चौकशी केली असता पिंपरी पोलीस ठाण्यातील पाच, हडपसर पोलीस ठाण्यातील एक आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून तीन लाख 50 हजार रुपये किमतीच्या दोन सॅन्ट्रो कार, 79 हजार 225 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण चार लाख 44 हजार 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवार (दि. 20) रोजी सराईत गुन्हेगार हर्षल पवार याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन लाख 46 हजार 800 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

गुरुवार (दि. 24) रोजी मिलिंदनगर पिंपरी येथे तिघेजण स्विफ्ट डिझायर (एम एच 12 / पी क्यू 6201) कारमधून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सॅम्युअल, अतुल आणि सागर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक लोखंडी कोयता, एक सुरा व एक स्विफ्ट डिझायर असा एकूण तीन लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सोमवार (दि. 28) रोजी पिंपरी कॅम्प मधील एका मोबाईल दुकानातून महेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 89 हजार रुपये किमतीचा एक अॅपल कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. त्याच दिवशी राहुल याला चिंचवड मधील सायन्स पार्कच्या कंपाउंडजवळून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 51 हजार रुपये किमतीची एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे असा माल जप्त करण्यात आला. वरील दोन्ही प्रकरणात पिंपरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे. बुधवारी (दि. 30) मोहननगर चिंचवड मधील परशुराम चौकातून करिझ्मा दुचाकीवरून (एम एच 14 / बी वाय 8881) जात असताना अक्षय यांच्याकडे विचारपूस केली असता, त्याच्याकडे चोरीचे पाच मोबाईल फोन आढळून आले. त्याच्याकडून दुचाकी आणि मोबाईलफोन असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आज (गुरुवारी) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे शुभम संशयितरित्या उभा असलेला आढळला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 16 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

पिंपरी पोलिसांनी ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, विठ्ठल बढे, हरिदास बोचरे, महिला पोलीस उपनिरीक्षक रत्नमाला सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय ननवरे, पोलीस हवालदार शाकीर जिनेडी, राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, पोलीस नाईक महादेव जावळे, जावेद पठाण, श्रीकांत जाधव, संतोष दिघे, प्रवीण वाजे, पोलीस शिपाई दादा धस, निलेश भागवत, उमेश वानखेडे, रोहित पिंजरकर, नितीन सूर्यवंशी, अविनाश देशमुख, संतोष भालेराव, शैलेश मगर, सुहास डंगारे, स्वप्नील झनकर, नामदेव पोटकुले, शिवा भोपे, सोनवणे, म्हेत्रे, विकास रेड्डी, विद्यासागर भोते, महिला पोलीस शिपाई सुषमा पाटील यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button