ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी पालिका आयुक्त वाघमारे यांची बदली, श्रवण हर्डीकर नवे आयुक्त

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महसूल विभागाच्या विभागीय आयुक्तपदी चंद्रकांत दळवी यांची तर पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी किरण गिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील 60 सनदी अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या असून त्याबाबतचा आदेश राज्य शासनाने काढला आहे. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांचा समावेश आहे. स्वतः वाघमारे यांनीही बदलीच्या वृत्तास दुजोरा दिला.

आयुक्त दिनेश वाघमारे यांनी 3 मे 2016  रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारला होता.  वाघमारे यांनी फक्त अकरा महिने 20 दिवस महापालिकेत काम केले. एका वर्षांच्या आतच त्यांची राज्य सरकारने मंत्रालयात समाज कल्याण  विभागात  सचिव पदावर  पदोन्नतीवर बदली केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नवे आयुक्त हार्डीकर  हेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातले मानले जातात.

दरम्यान, आयुक्त वाघमारे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करण्यास सुरूवातीपासून इच्छुक नसल्याचे म्हटले जात होते. त्यांनी आपल्या अकरा महिने 20 दिवसांच्या काळात एकही ठोस काम केले नाही. वाघमारे यांचे कुंटुंब मुंबईत राहत असल्यामुळे त्यांनीही राज्य सरकारकडे सातत्याने आपल्या बदलीसाठी पाठपुरावा केला होता.

राजीव जाधव यांच्या बदलीनंतर 3 मे 2016 ला दिनेश वाघमारे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांकडून निष्क्रियतेची टीका होत होती. महापालिकेच्या निवडणुका त्यांच्या काळात झाल्या. अखेर मुदतीपूर्वी त्यांची समाजकल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली झाली आहे.

श्रवण हर्डीकर हे 2005 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत. नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील अधिकारी हर्डीकर यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.

श्रावण हर्डीकर यांचे शिक्षण आणि बरेचसे वास्तव्य मुंबई-पुण्यासारख्या शहरी वातावारण झाले आहे. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्स्ट्रुमेंटेशन विषयात त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. हर्डीकर यांना वाचनाची विशेष आवड आहे. याशिवाय प्राणी आणि पक्षी निरीक्षणाचीही त्यांना आवड आहे.

2005 साली हर्डीकर आयएएस झाले आणि त्यानंतर ते कोल्हापूरला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले तेव्हा किंवा रत्नागिरी जिल्ह्यात दापोली उपविभागात सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम. अशातच जानेवारी 2008 मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. हर्डीकर यांनी जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. वाळूघाटाची ई-निविदा काढणारे ते पहिले अधिकारी होय. यवतमाळात त्यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला

विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांची सेटलमेंट कमिशनर म्हणून बदली झाली आहे. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांची पुणे विभागीय आय़ुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

पीएमआरडीच्या स्थापनेपासून सीईओपदाची धुरा सांभाळणारे महेश झगडे यांची नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी सध्या आमरावतीचे जिल्हाधिकारी असणाऱ्या किरण गिते यांची निुक्ती करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button