पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची २४ वी बैठक उत्साहात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची संचालक मंडळाची २४ वी बैठक विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे शुक्रवार (दि. १५) रोजी महाराष्ट्र राज्य वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर (IAS) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव (IAS), पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह (IAS), स्वतंत्र्य संचालक यशवंत भावे (ऑनलाईन), प्रदीप भार्गव, शहर अभियंता मकरंद निकम, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, व्यवस्थापक (इन्फ्रा.) मनोज सेठिया, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे आदी उपस्थित होते.
सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये, पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांची नामनिर्देशित संचालक म्हणून निवड करण्याच्या प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच, सन २०२२- २३ च्या वार्षिक ताळेबंदवर चर्चा करून त्यास मान्यता देण्यात आली.
आर्थिक वर्ष २०२३-२४साठी लेखापरीक्षक म्हणून सनदी लेखापाल मेसर्स विनोद सिंघल & कंपनी यांची पुनर्नियुक्ती करण्यासाठीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. जीआयएस सक्षम ईआरपी प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी मे. केपीएमजी या सल्लागार संस्थेस मुदतवाढ देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय घेण्याच्या विषयाला मान्यता देण्यात आली. यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या आजपर्यंतच्या भौतिक व आर्थिक प्रगतीची माहिती दिली. कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांनी आभार मानले.