Uncategorized

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 4 हजार 805 कोटींचे अंदाजपत्रक सादर!

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 2017-18 या आर्थिक वर्षासाठीचे जेएनएनयुआरएमसह 4 हजार 805 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (मंगळवारी) स्थायी समितीसमोर सादर केले. 1 कोटी 99 लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचविण्यात आली नाही.
महापालिका मुख्यालयातील तिस-या मजल्यावरील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात सकाळी अकरा वाजता स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्याकडे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सह आयुक्त दिलीप गावडे, स्थायी समिती सदस्य आदी उपस्थित होते. अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यासाठी मंगळवार (दि.25) पर्यंत स्थायी सभा तहकूब करण्यात आली आहे.
अंदाजपत्रकामध्ये प्रधानमंत्री आवाज योजनेसाठी 50 कोटी, अमृत योजनेसाठी 36.35 कोटी, स्मार्ट सिटीसाठी 49.50 कोटी, स्वच्छ भारत मिशनसाठी 97 कोटी, नगररचना भू-संपादनकरीता 137 कोटी, पीएमपीएमलसाठी 135 कोटी, पाणी पुरवठा विशेष निधी 70.50 कोटी, अपंग कल्याणकारी योजनेसाठी 20.42 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच महिलांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी 48.32 कोटी तरतूद केली आहे. मागासवर्गीय योजनांसाठी 53.77 कोटी, अपंग कल्याणकारी योजना 20.42 कोटी आणि क्रिडा निधीसाठी 33.63 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
अंदाजपत्रकाची ठळक वैशिष्टे!
# महापालिकेच्या जल:निसारण विभागासाठी 97 कोटी तरतूद
# पालिकेतील सामाविष्ठ गावात 32.11 किलो मीटर जल:निसारण नलिका टाकणे
# झोपडपट्टी क्षेत्रात 14.27 किलो मीटर नवीन जल:निसारण टाकणे
# चिंचवडगाव व थेरगाव यांना जोडणा-या पवनानदीवर 28 कोटीचा ‘बटर फ्लाय’ ब्रीज
# चिंचवडगाव येथे 50 लाखांचे दुमजली वाहनतळ उभारणार
# भोसरी येथे 12.5 कोटीचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र करणार
# कै. अण्णासाहेब मगर स्टेडीयम हे बालेवाडी क्रीडानगरीच्या धर्तीवर अद्यावत
# अजमेरा कॉलनी, थेरगाव आणि आकुर्डी येथे सुसज्ज रुग्णालय उभारणार
# थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये शिवचरित्रावर आधारीत ‘म्युरल्स’ उभारणार
# बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय आणि सखुबाई गवळी उद्यानात रंगीत कारंजे
# मासूळकर कॉलनी व खराळवाडी येथे मोठी उद्याने
# रावेत येथे बास्केट ब्रिजला लागून नवीन बंधारा बांधणार
# आंद्रा, भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा प्रयत्न
# चिखली व बोपखेल येथे मैलाशुद्धीकरण केंद्र
जमा तपशिल 
1) महसुली जमा                                                 – 2543.08 कोटी
2) भांडवली जमा                                                – 53.20 कोटी
3) जेएनएनयुआरएम केंद्र सरकार अनुदान               – 214.24 कोटी
4) जेएनएनयुआरएम राज्य सरकार अनुदान             – 103.89 कोटी
5) जेएनएनयुआरएम व महापालिकेच्या विविध योजना – 232.85 कोटी
6) जागतिक बँक कर्ज                                               – ..
7) यूटीएफ निधी                                                       – 111.54 कोटी
8) जीईएफ अनुदान                                                   – ..
9) लाभार्थी हिस्सा जेएनएनयुआरएम प्रकल्प                – 41.00 कोटी
10) इतर जमा                                                          – 66 कोटी
एकूण – 4805.31 कोटी
खर्च तपशिल 
1) महसुली खर्च            – 1560.18 कोटी
2) भांडवली खर्च            – 2435.15 कोटी
3) कर्ज निवारण निधी   – 1 कोटी
4)विकास निधी            – 70.50 कोटी
5) वाहन घसारा निधी   – 5 कोटी
6) अपंग कल्याणकारी योजना निधी – 2 कोटी
7) पीएपीएमएल राखीव निधी – 135 कोटी
8) अमृत योजना             – 36.35 कोटी
9) पंतप्रधान आवाज योजना – 50 कोटी
10) स्वच्छ भारत               – 97 कोटी
11) स्मार्ट सिटी               – 49.50 कोटी
12) घसारा निधी          –  15 कोटी
13 ) सातवा वेतन आयोग – 2 कोटी
14) इतर खर्च अनामत परताव्यसह – 223.95 कोटी
एकूण – 4682.63 कोटी
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button