%page_title%Mahaenews | Marathi News | News in marathi| Marathi latest news ...
January 19, 2021
BREAKING NEWS
ad

पिंपरी-चिंचवड परिसरात जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद; कडकडीत बंद

पिंपरी – महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड परिसरात जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. आज एकही व्यक्ती घराबाहेर दिसली नाही. सायंकाळी पाचच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे सर्व नागरिकांनी आपापल्या इमारतीतच्या गॅलरीत थांबून थाळी आणि टाळ्या वाजवल्यामुळे अवघा परिसर दुदुमून गेला होता.

पिंपरी-चिंचवड परिसरात आज सकाळ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत जे घडलं नाही ते जनता प्रतिसादामुळे घडल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी-चिंचवड शहरात अशी स्मशान शांतता कधीच पाहायला मिळाली नव्हती. मात्र, कोरोना विषाणू आला आणि सर्व काही बदलून गेले. शहरात ऐकून १२ बाधित रुग्ण आढळले असून नागरिकांना काळजी घेण्याची आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, सकाळपासून घरातून बाहेर न निघालेल्या नागरिकांनी बरोबर पाच वाजता इमारतीच्या आपापल्या गॅलरीत येऊन टाळ्या आणि थाळी वादन करण्यास सुरुवात केली.

यामुळे अचानक शांत झालेला परिसरातून थाळ्यांचा आवाज कानावर पडला. हे सर्व पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव, पवनानगर भागात पाहायला मिळालं. सर्वत्र केवळ थाळी आणि टाळ्यांचा निनाद होता. येवढच नाहीत काहींनी शंख वाजवला तर काहींनी फटाक्यांची आतषबाजी केली. यामुळे परिसरातील वातावरण हे चैतन्यमय झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचच्या सुमारास घराबाहेर येऊन थाळी किंवा शंख वाजवण्याचे देखील आवाहन केले होते

©2017,Express MediaEnterprises-All Rights Reserved.Contact Designer Your Are Visitor : 1682494

%d bloggers like this: