breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पिंपरीत राजकीय पक्षाच्या अनधिकृत कार्यालयाला पालिकेचा राजाश्रय

  • पीएमपीएमएलचे पास केंद्र हटविले
  • कारवाईत प्रशासनाचा पक्षपातीपणा

पिंपरी- अनधिकृत बांधकामांवरील कारवाई करताना नियम धाब्यावर बसवून पालिका प्रशासनाने कारवाईची बोळवण केली आहे. पिंपरी चौकातून भोसरीकडे जाणा-या रस्त्याच्या बाजुला थाटलेल्या टप-या आणि पीएमपीएमएलचे पास केंद्र हटविण्यात आले. मात्र, आरपीआयच्या कार्यालयाला धक्का सुध्दा लावला नाही. पालिका प्रशासनाने राजकीय पक्षांच्या कार्यालयावर कारवाई न करता त्यांना राजाश्रय दिला आहे. त्यामुळे कारवाईत देखील पक्षपातीपणा होत असल्याचे समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून भोसरीकडे जाण्याचा मार्ग आहे. या रस्त्यावर महत्मा फुले पुतळ्यापर्यंत चौकाच्या बाजुलाच बेकायदेशीर हातगाड्या, टप-या थाटल्या आहेत. याठिकाणी आरपीआयचे जनसंपर्क कार्यालय देखील आहे. विशेष म्हणजे याठिकाणच्या पीएमपीएमएल कार्यालतून पुण्यात जाणा-या गाड्या सोडल्या जातात. विद्यार्थ्यांना पास देण्यासाठी पास केंद्रही कार्यरत होते. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना पास दिले जात होते. मात्र, या अतिक्रमणामुळे हा रस्ता अरुंद झाल्याने कारवाई करण्यात आली आहे.

नेहरूनगर, भोसरीत जाणा-या अॅटो रिक्षाचे स्टॅण्डही याच ठिकाणी आहे. रिक्षा रस्त्यावर बेशिस्त पध्दतीने लावले जातात. त्यामुळे चौकातून भोसरीकडे मार्गस्त होताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे पालिकेच्या बांधकाम परवानगी आणि अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 17) याठिकाणी कारवाई करून टप-या हटविल्या. मात्र, आरपीआयच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई केली नाही. या कारवाईमध्ये पालिका प्रशासनाने राजकीय पक्षाच्या कार्यालयाला राजाश्रय दिला आहे, असा आरोप नागरिक करत आहेत. संबंधित राजकीय पक्षाच्या कार्यालयावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिका-यांनी सांगितली

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button